गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा फरार आरोपीला परंडा पोलिसांनी केली अटक

फरार आरोपीला परंडा पोलिसांनी केली अटक

उस्मानाबाद: २७ जून २०२० : खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलीसांना अखेर आज यश मिळाले. भूम तालुक्यातील सावरगाव मधील श्रीमती छाया हरी काळे ही परंडा पोलीस ठाणे गु.र.क्र. ११०/ २०१८ या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून ती पोलीसांना गुंगारा देत असल्या कारणाने पोलिसांच्या हाती लागत नव्हती.

इतक्या दिवसांच्या शोधानंतर, स्था.गु.शा. च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काल दिनांक २६ जून रोजी तीला पकडले. तसेच उर्वरित तपासाकामी तिला पोलीस ठाणे परंडा च्या ताब्यात दिले. संबंधित कारवाई पो.उप.नि. श्री. पांडुरंग माने, पो. हे.कॉ.- जगताप, थोरात, पो.ना. हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पो.कॉ. अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version