रायगड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत परत एकदा हेलिकॉप्टरची दुर्घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पेणमधील हेलिपॅडवरील चिखलात रुतल्याने ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतहून हेलिकॉप्टरने रायगडमध्ये आले. हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे उरताना हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण मिळवले आणि पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते. दरम्यान, कोणालाही काही दुखापत झालेली नाहीये.