मुंबई, १८ डिसेंबर २०२०: मुंबई क्राइम ब्रँचनं एका टीव्ही कलाकाराला अटक केली आहे. बनावट पोलिस बनून या अभिनेत्यावर वृद्धांना लुटल्याचा आरोप आहे. त्याची अटक देहरादून पोलिसांच्या माहितीवरुन करण्यात आली.
सलमान जाफरी असं या अभिनेत्याचं नाव आहे. छत्रपती राजा शिवाजी, सावधान भारत यासारख्या मालिकांव्यतिरिक्त गुलमकाई आणि बहिचोर सारख्या चित्रपटातही या अभिनेत्यानं पात्र अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते वृद्धांची फसवणूक करण्यासाठी विमानानं चंदीगड, देहरादून आणि उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये जात असत. गुन्हा केल्यावर पुन्हा मुंबईत यायचा.
३ डिसेंबर रोजी, ४० वर्षीय अभिनेता सलमान जाफरीनं देहरादूनच्या पटेल नगरात एका वृद्ध महिलेला फसवून लुटलं. सलमाननं महिलेला धमकावून ५ लाख रुपये घेतले. देहरादून पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून मुंबईत लपून बसलेल्या शातिर चोरांची माहिती मिळविली. त्यानंतर थोड्याच वेळात देहरादून पोलिसांनी मुंबई क्राइम ब्रँचला कळविलं, त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ८ ने त्यांच्या तपासात सलमानचा ओशिवरा येथे पत्ता शोधून त्याला पकडलं.
गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितलं की, आरोपींवर नागपुरात ३ आणि उत्तराखंडमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी सलमानला उत्तराखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे, तर त्याच्या अन्य साथीदारांचा शोध अद्याप सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव