अमिताभ यांनी सोडली पान मसाला ब्रँडची जाहिरात, सोशल मीडियावर झाले होते ट्रॉल

मुंबई, 12 ऑक्टोंबर 2021: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना काही काळापूर्वी पान मसाला जाहिरात केल्यामुळं सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि ही जाहिरात केल्यामुळं त्यांना खूप लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यांनी यावर फारशी प्रतिक्रिया दिली नाही, पण आता अमिताभ बच्चन यांनी या प्रकरणी निर्णय घेतला आहे. त्यांनी या जाहिरातीतून आपलं नाव मागं घेतलंय. याचं कारण स्पष्ट करताना त्यांनी असं म्हटलंय की ते हे करत आहे जेणेकरून नवीन पिढीला पान मसाला वापरण्यास प्रवृत्त करू नये. या जाहिरातीसाठी मिळालेले शुल्कही त्यांनी परत केलं आहे.

अमिताभ यांनी कमला पसंद जाहिरातीतून नाव घेतलं मागं

अमिताभ बच्चन यांनी कमला पसंद पान मासालाची ऍड केली होती, त्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. लोकांचा असं म्हणणं होतं की देशातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व असल्याने अमिताभ बच्चन यांनी अशा जाहिराती करू नयेत. राष्ट्रीय तंबाखूविरोधी संघटनेनं अमिताभ बच्चन यांना या जाहिरातीतून त्यांचं नाव मागं घेण्याची विनंती केली होती.

सोशल मीडियावर ट्रोल

याशिवाय अमिताभ बच्चन यांचे काही चाहतेही या प्रकरणामध्ये संतापले होते आणि त्यांना आपल्या अभिनेत्याचं हे पाऊल आवडलं नाही. आता अमिताभ यांनी अधिकृत निवेदन जारी केलंय. दरम्यान, पान मसाला ऍड केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांच्या एका चाहत्याने त्यांना प्रश्नही विचारला होता. याला उत्तर देताना अमिताभ म्हणाले होते- ‘जर एखाद्या संस्थेला याचा फायदा होत असेल तर आपण असं का करू नये. जसा आपला उद्योग चालतो, तसाच त्यांचा उद्योगही चालतो. तुम्हाला असं वाटतं की मी हे करू नये पण त्यासाठी मला पैसे मिळाली आहे. ‘

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा