गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी

बारामती, २१ ऑक्टोबर २०२०: राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका यांच्या वतीने परतीच्या झालेल्या धुवांधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याला भरपाई मिळावी यासाठी आज बुधवार दि. २२रोजी बारामती तहसीलदार कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नुकसान झालेल्या शेतमालाची होळी करून बोंब मारून सरकारचा निषेध करण्यात आला.

बारामती तालुक्यात झालेल्या धगफुटीने शेतकऱ्याच्या शिवारातील पाणी साचून राहिले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी सगळ्या पक्षाचे नेते येत आहेत. या नेत्यांनी दौरे थांबवावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी व लवकरात लवकर सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करवा तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी ५०,००० ( पन्नास हजार ) तात्काळ मदत द्यावी या मागणी साठी आज प्रशासन भवन येथे आंदोलन करण्यात आले व नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन देऊन आपली मागणी शाषण दरबारी पोहचवू असे आश्वासन दिले.

या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माणिकराव दांगडे, आण्णा रूपणवर, जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे, तालुका अध्यक्ष अँड अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, काका बुरूंगले, गिरीधर ठोंबरे, शैलेष थोरात, लखण कोळेकर, अविनाश मासाळ, चंद्रकांत
वाघमोडे, भिसे, दिलीप धायगुडे, किशोर सातकर, निखील दांगडे, भुषण सातकर, तेजस जमदाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version