पुण्यातील खडकी येथील एम्यूनेशन फॅक्टरीने केले ४० एमएम यूबीजीएल दारुगोळ्याचे उत्पादन

पुणे, १३ ऑगस्ट २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. या नाऱ्या अंतर्गत उत्पादने आयात न करता ती भारतातच बनवली जावी यावर भर देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे चीनसोबत झालेली हिंसक चकमक. यानंतर देशात चीन विरोधी वातावरण निर्माण झाले व बऱ्याच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, देशी उत्पादनांविषयी लोकांच्या मनात तीव्र भावना निर्माण झाली. ह्याच बाबत दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा उपकरणांच्या बाबतीत देखील भारत आत्मनिर्भर होणार असल्याचे स्पष्ट केले.

सुरक्षा उपकरणांच्या बाबतीत भारत आता बाहेरून आयात केली जाणारी सुरक्षा उपकरणे स्वतः भारतामध्ये बनवणार आहे. टप्प्याटप्प्याने हळूहळू आपण ही सुरक्षा उपकरणे आयात करणे बंद करणार आहोत. अशातच आता आणखीन एक चांगली बातमी सुरक्षा उपकरणाच्या बाबतीत समोर आली आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या नाव्याने प्रेरित होऊन पुण्याच्या खडकी येथील दारूगोळा कारखान्याने (अम्युनिशन फॅक्टरी) ४० एमएम यूबीजीएल(अंडर बॅरेल ग्रेनेड लाँन्चर) दारुगोळ्याचे उत्पादन करून स्वयंपूर्णता आणि स्वदेशीकरणात एक नवीन अध्याय लिहिला आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी सीमा सुरक्षा दलाला या कारखान्यातून या दारुगोळ्याचा पहिला साठा पाठवण्यात आला.

५.५६ एमएम रायफल (आयएनएसएएस) च्या बॅरेलखाली बसवण्यात आलेल्या लाँचरमधून याची चाचणी घेण्यात आली.

पारंपारिक हँड ग्रेनेड आणि ४० एमएम युबीजीएल दारूगोळ्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेतः

१) हे कमी वजनाचे आहे

२) हँड ग्रेनेडच्या ३० मीटरच्या तुलनेत याचा पल्ला ४०० मीटर आहे.

३) जवानांकडून एकाच उपकरणाद्वारे तो वापरता येऊ शकतो

४) जवानांना बरोबर नेण्यासाठी हा अतिशय सुरक्षित दारुगोळा आहे

दारुगोळ्याचे चार प्रकार आहेत: –

१) ४० एमएम यूबीजीएल (प्रॅक्टिस )

२) ४० एमएम यूबीजीएल (एचईएपी )

३) ४० एमएम यूबीजीएल (एचईडीपी)

४) ४० एमएम यूबीजीएल (आरपी) बरोबर घेऊन जाण्यासाठी हा अतिशय सुरक्षित दारुगोळा आहे.

४० एमएम यूबीजीएल दारुगोळ्याची संरचना आणि उत्पादन खडकी येथील दारुगोळा कारखान्याने केले असून यासाठी भारतीय उद्योगांकडून सुटे भाग मागवण्यात आले.

लष्कर आणि गृह मंत्रालय युनिटकडून हा दारुगोळा आयात करण्यात येत होता. त्यामुळे देशातच या दारुगोळ्याची संरचना तयार करून त्याचे उत्पादन घेण्याची गरज होती.

खडकी येथील दारूगोळा कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एम. के मोहपात्रा यांनी ४ ऑगस्ट २०२० रोजी ४० एमएम यूबीजीएल (प्रॅक्टिस) ची तपासणीचे पत्र सीमा सुरक्षा दलाचे डीआयजी अशोक कुमार झा यांना सुपूर्द केले.

ऑर्डिनेन्स फॅक्टरी बोर्डचे डीजीओएफ आणि अध्यक्ष हरी मोहन आणि खडकी येथील दारूगोळा कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एम. के मोहपात्रा यांनी ११ ऑगस्ट २० रोजी ओएएफबी, एएफके आणि जेसीएमचे सदस्य आणि कृती समिती आणि संघटनाच्या सदस्यांच्या उपस्थितीत सीमा सुरक्षा दलाला ४० एमएम यूबीजीएल (प्रॅक्टिस) च्या पहिल्या खेपेला रवाना केले.

या उत्पादनामुळे खडकी येथील दारूगोळा कारखान्याने संरक्षण उत्पादनाच्या दिशेने भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि आयातीला पर्याय उपलब्ध करून देऊन बहुमूल्य परकीय चलनाची बचत करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात सहभागी झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा