उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरात अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमाण वाढले..पोलिसांपुढे आव्हान

12

नागपूर , १२ सप्टेंबर २०२२: नागपूरात गेल्या वर्षीच्या तुलनेत अंमली पदार्थाच्या तस्करीत दुपटीने वाढ झाली आहे. तरुणाईला गांजा, एम.डी. यांसारख्या ड्रग्जचा विळखा पडत आहे. त्यामुळे या तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

नागपूरात तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या आहारी चालली आहे. ड्रग्ज पेडलर शहरात गांजा, चरस, ब्राऊन शुगर, एम.डी. यासारख्या ड्रग्जची तस्करी करुन तरुणांमध्ये त्यांचा प्रसार करण्याचं काम करत आहेत. या तस्करीसाठी महाविद्यालयीन तरुणांचा उपयोग केला जात असल्याची माहिती समोर आली आहे‌.

नागपूर पोलिसांनी गेल्या वर्षी तस्करीचे ७५ गुन्हे उघडकीस आणले असून, यात १०४ आरोपींना अटक केली होती. तर यावषी सात महिन्यात तस्करीचे ४७ गुन्हे उघडकीस आणत ७३ आरोपींना अटक केली आहे. यावरुन शहरात अंमली पदार्थाच्या विळखा वाढत चालल्याचं दिसून येत आहे. या ड्रग्ज पेडलरच्या मुसक्या आवळून तरुणाईला यापासून मुक्त करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर