नवी दिल्ली, २६ जून २०२१: कोरोना बाधित कर्मचार्याच्या आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उपचारासाठी कंपनीने दिलेली भरपाई करमुक्त करण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. सरकारचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा देशातील बर्याच कंपन्या आपल्या कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनामध्ये संसर्ग झालेल्या कुटूंबियांना एक्स-ग्रॅशिया पेमेंटद्वारे आर्थिक मदतीची घोषणा करीत आहेत.
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी सरकारनं शेवटची तारीखही ३ महिन्यांपर्यंत वाढविलीय. तसेच करदात्यांना आणखी दिलासा देताना टीडीएस दाखल करण्याची शेवटची तारीख ३० जून ते १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आलीय. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
एक्स-ग्रेशिया पेमेंट मर्यादा १० लाखांपर्यंत
अनुराग ठाकूर म्हणाले की, कोविडच्या उपचारासाठी कंपनीकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून घेतलेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. ही सूट व्यवसाय वर्ष २०१९-२० आणि २०२१-२२ साठी आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्या मित्राला, नातेवाईकांना किंवा इतर कोणाला केवळ मदत करण्यासाठी पैसे दिल्यास कर सूट मिळेल. याची मर्यादा १० लाखांपर्यंत असेल.
कर कपात दावा करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत केलेली गुंतवणूक ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करता येईल, असेही ते म्हणाले. कर तज्ञांचं म्हणणं आहे की, नवीन अधिसूचना कर्मचार्यांच्या पगारानुसार मिळणाऱ्या कर सूटपेक्षा वेगळी आहे. याविषयी पुढील एक-दोन दिवसांत अधिक माहिती दिली जाईल.
पॅन आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख ३ महिन्यांनी वाढवून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्यात आलीय. आतापर्यंत ही अंतिम मुदत ३० जून २०२१ होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे