भारताला टी- २० विश्वचषक जिंकून देणार्‍या ‘या’ खेळाडूची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी २०२३ : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ चा टी- २० विश्वचषक जिंकला होता. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती जाहीर केली आहे.

जोगिंदर शर्माने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना पत्र लिहून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ३९ वर्षीय जोगिंदर शर्मा मागील अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला नाही आहे. २००७ मध्येच त्याने शेवटाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

  • छोट्या कारकिर्दीत मोठे नाव कमावले

जोगिंदरने भारतासाठी एकूण चार टी- २० आणि तेवढेच एकदिवसीय सामने खेळले आहेत. २००७ चा टी- २० विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदर काही वर्षे आयपीएलही खेळला होता.

  • सध्या हरियाणामध्ये डीएसपी म्हणून कार्यरत

जोगिंदर शर्माला हरियाणा राज्य सरकारने टी- २० विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल २१ लाखांचे रोख बक्षीसही दिले होते. यानंतर हरियाणाच्या या क्रिकेटपटूने हरियाणातच पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. सध्या जोगिंदर हरियाणामध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा