द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेकडून ६५० कुटुंबांना अन्नधान्य वाटप

पुणे, दि.११ मे २०२० : द आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेकडून आज (सोमवारी) आंबिल ओढा वसाहतीमधील ६५० कुटुंबियांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

या किटमध्ये अन्न धान्याचे किट वाटण्यात आले . तेल, मीठ, साबण, तांदूळ,तिखट, गहू , हळद, डाळ या पदार्थांचा समावेश आहे. या मध्ये द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था , इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हल्यू संस्था , महा न .जि.ओ. फाऊंडेशन अशा तीन संस्था मिळून पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल ह्यांचासोबत संलग्न होऊन पुण्यात ठीक ठिकाणी मदत पोहचवत आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २९ मार्चपासून सातत्याने ह्या संस्था मदत करत आहेत. पुण्यातील व महाराष्ट्रातील सोळा जिह्यातील सुमारे ४७ लाख लोकांपर्यंत मदत कार्य पोहचले आहे. त्याचसोबत पुण्यातील नायडू रुग्णालयात दोन कोटी हेल्थ मटेरियल देण्यात आले आहेत. रोज पुण्यातील वस्तीपातळीवर पुण्याच्या जवळील भागांमध्ये त्याच्यासोबत फुगे विकणारे , डोंबारी खेळ करणारे लोक अशा सर्वांपर्यंत रोज जेवण पुरवले जात आहे.

लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही,तोपर्यंत मदतकार्य सुरू राहील अशी माहिती न्यूज अनकटच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र चे कोविड १९ रिलीफ प्रोजेक्टचे हेड शशांक ओमभासे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा