गोल पोस्ट गुन्हा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर हल्ला करणारा हल्लेखोर फरार.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर हल्ला करणारा हल्लेखोर फरार.

उस्मानाबाद, १७ ऑगस्ट २०२०: खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खूनी हल्ला केलेला हल्लेखोर अजिंक्य टेकाळे आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी पोलीसांच्या ताब्यातून फरार झालेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ रोजी पाडोळी (नायगाव) येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत गेले असता, या गावातीलच अजिंक्य टेकाळे या तरूणाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर चाकूने हल्ला केला होता. मात्र, या खूनी हल्ल्यात खासदार ओमराजे बचावले.

तसेच, संबंधित हल्लेखोराला पोलीसांनी अटक करून जेरबंद केले. मागील दहा महिन्यांपासून हा हल्लेखोर जेल मध्येच होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या जेल मधुन तो आज फरार झाल्याचे समोर आले आहे.

कोरानाच्या पार्श्वभूमीवर तांबरी विभागात तात्पुरते कारागृह करण्यात आलेले आहे. संबंधित हल्लेखोर अजिंक्य टेकाळे याला या कारागृहात सध्या ठेवण्यात आले. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातून परत तात्पुरत्या जेलमध्ये आल्यानंतर संबंधित जेल पोलीसांना हिसका देऊन तो पळून गेला असल्याची माहिती पोलीसांनी दिलेली आहे. तसेच, त्याला शोधण्यासाठी पोलीसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version