पुणे, १२ ऑगस्ट २०२०: पुणे शहरातील वाहतूक विभागात नोव्हेंबर २०१७ पासून बेवारस बिनधनी दुचाकी, तीनचाकी, चार चाकी, अशी ११५ वाहने विमानतळ रस्त्यावरील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त कार्यालयात जमा आहेत.
सदरची वाहने ओळखून घेऊन जाण्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्धी करून तसेच सदर वाहनाच्या मालकांचा शोध घेऊनही मालक मिळून आले नाहीत या वाहनांची स्थिती खूप दिवस हे वाहने पडून असल्याने गंजलेली व खराब झालेली आहेत.
या वाहनाची कायदेशीर बाबींची पूर्तता करून लिलावाची मंजुरी मिळालेली असून सदर वाहनांचा लिलाव शुक्रवारी दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता विमानतळ रस्त्यावरील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त कार्यालयच्या आवारात करण्यात येणार आहे. असे बोलताना येरवडा वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे