पत्नीच्या नावे असलेल्या कंपनीमार्फत अधिकाऱ्यांने घातला मॉइलला गंडा

8

नागपूर, १ जून २०२३ : आपल्या पत्नीच्या नावाने कंपनी स्थापन करून मॉइलची १ कोटी ३५ लाख रुपयांनी एका अधिकाऱ्याने फसवणूक केली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी केल्याने इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अरुण गज्जेलवार असे या मुख्य वित्त व्यवस्थापकपदी असलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.

नारी रोड दीक्षित नगर येथील निवासस्थानी व कार्यालयात एकाच वेळी सीबीआयने ही कारवाई केली. सचिन गज्जेलवार यांच्या निवासस्थानी तसेच धरमपेठेतील भगवाघर लेआउट परिसरात असलेल्या मेसर्स इझीकॉम सोल्युशन जरीपटक्यातील मेसर्स इको टेक सव्हिर्सेस व एक सहकारी व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या सचिन यांची पत्नी नीलिमा यांच्या नावाने आहेत.

कंपनीच्या नावाने एक कोटी पेक्षा अधिक कर्जही घेतले मात्र कर्जाची कंपनीच्या व्यवहारात नोंदच केली नाही हे सर्व आक्षेपार्ह व्यवहार नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२२ च्या काळात झाले आहेत. आता सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे धाडसत्र आरंभ केल्यानी मॉइलमधील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा