बदाम खाण्याचे फायदे…

पुणे, १२ फेब्रुवरी २०२१: सध्या काळ बदलला आहे. त्यामध्ये आरोग्याकडे कोणाचेही लक्ष नाही. आपण नेहमी आपल्या मोठ्यांकडून ऐकतो कि सुखे मेवे अर्थात ड्रायफ्रुट्स खाणं शरीरासाठी आणि आरोग्याला चांगले. परंतु, आपण विचार करतो की यामुळे वजन वाढेल म्हणून याचे सेवन करणे आपण टाळतो. पण, आज ड्रायफ्रुट्स मधील बदामाचे फायदे जाणून घेणार आहोत.

दररोज बदाम खल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रोटीन जसे की मिनरल पर्याप्त मात्रेत असून तसेच तांबे, विटामिन बी, कॅल्शियम, लोह चांगल्या प्रमाणात आहे. एक रिसर्च नुसार जो व्यक्ति आठवड्यात ५ दिवस बदाम खातो त्याचे हार्ट अटॅक चे प्रमाण ५०% पर्यंत कमी होऊन जाते.

बदाम मध्ये पोटेशियमची मात्रा जास्त आसते तसेच सोडियमचे प्रमाण कमी आढळते ज्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचा संचार व्यवस्थित होतो. बदामामुळे वजन कमी देखील होण्यासाठी मदत होते. बदाम थोडेसेच खाल्ले तर लगेच पोट भरते आणि तुम्ही जास्त जेवण करण्यापासून वाचता. तर यामध्ये जिंक देखील असून जर बदाम खाल्ले तर गोड साखर खाण्याची इच्छा कमी होऊन जाते.

त्यामुळे बदाम खाणं हे आरोग्यासाठी चांगले असून तुम्ही बदाम खा आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा