गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘द बिग बुल’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज

‘द बिग बुल’ चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज

मुंबई : अजय देवगणसह अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूज यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द बिग बुल’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर अजय देवगणने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
हा चित्रपट १९९० ते २००० दरम्यान भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर आधारीत आहे. दरम्यान ‘बोल बच्चन’ चित्रपटानंतर अजय देवगण व अभिषेक बच्चन प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
अजयने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये फक्त एक व्यक्ती दिसत असून, ती कोण आहे याचा खुलासा होत नसल्याने, चित्रपटाविषयी उत्सुकता वाढत आहे.
याआधीच अभिषेक बच्चनने सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शूटिंगची माहिती दिली होती.त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version