चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती गणरायाची जयंती भक्तीमय वातावरणात साजरी; दर्शनासाठी मंदिरांत गर्दी

निगडी, २५ जानेवारी २०२३ : चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या माघ महिन्यातील जयंतीचा उत्साह राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरात भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे.

गणेश जयंतीनिमित्त चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील मंदिरांत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याचबरोबर गणपती मंदिराच्या आवारात आणि सभामंडपात सुद्धा आकर्षक रंगरंगोटी आणि फुलांची सजावट करून गणेश जयंती साजरी केली जात आहे. गणेश जयंतीनिमित्त पहाटेपासूनच विविध भागांतील गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत निगडी-प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, रूपीनगर, त्रिवेणीनगर, चऱ्होली, चिखली, मोशी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, भोसरी, पिंपरी आदी विविध ठिकाणच्या गणेश मंदिरामध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेश जयंती साजरी होत आहे.

गणेश जयंतीनिमित्त ठिकठिकाणी महाप्रसाद, खिचडी; तसेच लाडूचे वाटप केले जात आहे. या वर्षातील ही पहिलीच गणेश जयंती असल्याने भाविकांनी या गणेश गणेश जयंतीसाठी मोठी गर्दी केली आहे

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा