गोल पोस्ट गुन्हा बत्तीस वर्षीय तरूणाचा सिध्दटेक येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

बत्तीस वर्षीय तरूणाचा सिध्दटेक येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

कर्जत, दि. २४ जुलै २०२०: सिद्धटेक येथे भीमा नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. कर्जत तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या सिद्धटेक येथील भीमा नदीच्या पात्रात आज दुपारी साडे अकरा ते बाराच्या सुमारास एक मृतदेह वाहत असल्याचे आढळले होते.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढला आहे. सदर व्यक्ती विठ्ठल नामदेव दगडे वय अंदाजे बत्तीस वर्ष मूळ राहणार खराडी पुणे सध्या राहणार राक्षस वाडी खुर्द असे असून त्याच्या नातेवाईकांना ही माहिती कळविण्यात आली आहे.

यावेळी पोलिस उप निरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस नाईक पांडुरंग वीर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, पोलीस पाटील दादासाहेब भोसले व इतर नागरिक च्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मध्ये पाठविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने पुढील तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version