कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे विहिरीत तरंगत्या अवस्थेत आढळला मृतदेह

कर्जत, २२ ऑगस्ट २०२०: कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे गावाजवळील विहिरीत एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. कोरेगाव गावठाण जवळील गुलाबराव बाबुराव शेळके यांच्या विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावातील काही लोकांनी पाहिल्यानंतर सदर माहिती सरपंच काकासाहेब शेळके यांना देण्यात आली.

कर्जत  पोलिस स्टेशनला ही माहिती दिली असता, पोलीस हवालदार महादेव गाडे, पो. कॉ. वैभव सुपेकर, पो. कॉ. विकास चंदन हे या ठिकाणी तातडीने पोहचले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सदर मृतदेह  विहिरीच्या बाहेर काढला.

सदर व्यक्ती कोरेगाव जवळील पेटकरवस्ती येथील नवनाथ बापूराव पेटकर वय ५५ हे असल्याचे लक्षात आले. सदर व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कडे पाठविण्यात आला असून सदर व्यक्तीने आत्महत्या केली की घातपात आहे.हे पुढील तपासातून पुढे येणार आहे. कर्जत पोलिस पुढील तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा