गोल पोस्ट राष्ट्रीय प्लास्टिकच्या आवरणात लपेटलेला मृतदेह तलावात तरंगताना आढळला

प्लास्टिकच्या आवरणात लपेटलेला मृतदेह तलावात तरंगताना आढळला

हैदराबाद (तेलंगणा) २२ जून २०२० : – हैदराबादमधील सुननाम चेरूव तलावामध्ये प्लास्टिक मधे लपेटलेल्या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांनी तलावात तरंगता एक मृतदेह पाहिला आणि पोलिसांना कळवले . सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तलावातील मृतदेहाचे अवयव कापड्याने बांधलेले होते.

एका वृत्तसंस्थेबरोबर फोनवर बोलताना निरीक्षक चंद्रशेखर रेड्डी म्हणाले, ”स्थानिकांना पाण्यात तरंगणारा एक मृतदेह आढळला आणि त्यांनी पोलिसांना सतर्क केले. तलावावरून मृतदेह बाहेर काढला असता, तो एका महिलेचा असल्याचे आढळले. स्त्रीचे हातपाय व शरीर बांधलेले होते. मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात लपेटलेला होता.

खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून , मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version