बॉलीवूडची अभिनेत्री हातात बॅट घेऊन उतरली मैदानात

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२२ : ‘धडक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री जान्हवी कपूर हिने एक फोटो पोस्ट केला आहे. ‘धडक’, ‘गुंजन सक्सेना : ‘द कारगिल गर्ल’, ‘गुडलक जेरी’ आणि ‘मिली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने तिच्या अभिनय कौशल्यावरून विविध पात्र साकारलेली आहेत. आता सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या सेटवरील फोटो जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये जान्हवीच्या हातात क्रिकेटची बॅट आणि खांद्यावर किनेसिओ टेप्स पाहायला मिळत आहेत. एक मिनिट झालाय असा कॅप्शन लिहून तिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोला चाहत्यांनी लाईक करीत भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिका साकारतो आहे. याच चित्रपटाचा सेटवरील हा फोटो असू शकतो. ‘रुही’ या चित्रपटातून देखील राजकुमार राव आणि जान्हवी याआधी प्रेक्षकांना भेटले आहेत.

जान्हवीच्या पोस्टने अनेक चाहत्यांना कमेंट करायला भाग पाडले आहे. ‘आता टीम इंडियाला हिची गरज आहे’, ‘के एल. राहुलची रिप्लेसमेंट मिळाली’, ‘क्रिकेट कधीपासून…’, ‘सॉरी विराट, जान्हवी माझी आवडती क्रिकेटर आहे’ या व अश्या अनेक कमेंट्स या पोस्टखाली पाहायला मिळत आहेत. शरण शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या आयुष्यावर आधारित असल्यास म्हटले जात आहे; परंतु दिग्दर्शक किंवा निर्मात्यांनी यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा