गोल पोस्ट गुन्हा मुलानेच केला बापाचा खून.दोन दिवसाच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

मुलानेच केला बापाचा खून.दोन दिवसाच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

शिराळ, माढा, २८ जुलै २०२० : माढा तालुक्यातील शिराळ टे येथील संजय काळे या युवकाचा शेवरे हद्दीत उजनी कालव्याच्या बाजूला दोन दिवसापूर्वी निर्दयीपणे खून करुन टमटमसह अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना दोन दिवसात यश आले आहे. हा निर्दयी खून कोणी बाहेरच्यांनी केला नसून पोटच्या मुलानेच अन्य दोघांच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे.

शिराळ (ता. माढा ) येथील संजय मारुती काळे यांचा शनिवार (ता. २५ जुलै) टेंभुर्णी-अकलूज रोडवरील शेवरेतील हद्दीत उजनी कालव्याच्या बाजूला खून करून मृतदेह टमटमसह पुरावा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. या खुनाचा तपास लावण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आले आहे. आकाश संजय काळे यानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा म्हणजेच संजय काळेचा आपल्या दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली. यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मयत संजय मारुती काळे (वय ५५ , रा. शिराळ, ता.माढा) यांचा खारी, टोस्ट बेकरीच्या व्यवसायासह खासगी सावकारीही करीत होता. टेंभुर्णी-अकलुज रोडवरील शेवरेतील उजनी कालव्याच्या बाजुला संजय काळेची हत्या करून मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद मयताचा मुलगा अकाश संजय काळे याने दिली होती.

फिर्याद देताना पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला पोलिसी खक्या दाखवताच , मीच जन्मदात्या वडिलाचा खून केल्याचे त्याने कबूल केले.

खूनाचे कारण आले समोर :जन्मदात्या वडिलांचे बाहेर असणारे अनैतिक संबध असल्या कारणावरून घरात सतत होणारे वाद आणि वडिलांचे सर्वांना घालून पाडून बोलणे या कारणावरून हा खून केल्याचे मुलाने सांगितले.

लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे (वय २७ वर्षे ) व अलाऊद्दीन ऊर्फ आलम बासू मुलाणी (वय ३३ वर्षे दोघे रा.सुर्ली ता.माढा) या दोन साथीदारांच्या मदतीने खुन केला असल्याची कबुली मुलाने दिली आहे. सदर तिन्ही आरोपींना माढा न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी :प्रदीप पाटील.

error: Content is protected !!
Exit mobile version