गोल पोस्ट गुन्हा वधू मेक-अप करण्यासाठी गेली आणि तिच्या प्रियकराने तीच्यावर केले वार

वधू मेक-अप करण्यासाठी गेली आणि तिच्या प्रियकराने तीच्यावर केले वार

रतलाम ६ जुलै २०२० : मध्य प्रदेशचा रतलाम जिल्हा. येथील जावरा परिसर. ५ जुलै रोजी येथील एका ब्युटी पार्लरमध्ये एका वधूचा मृत्यू झाला . राम यादव असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सानू यादव हि शाजापूर जिल्ह्यातील रहिवासी होती . तीचे लग्न नागदा येथील एका मुलाशी ठरले होते. नागदाजवळील जावरा येथे हा विवाह सोहळा पार पडला.५ जुलै रोजी सकाळी सानू आपल्या बहिणीसमवेत मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये पोहोचली. त्यानंतर तीला राम यादवचा फोन आला. त्याला भेटण्यासाठी शानूने त्याला पार्लरमध्ये बोलावले.

राम त्याचा मित्र पवन पांचाळसमवेत पार्लरमध्ये पोहोचला. तो तेथे दोन मिनिटे बसला, त्यानंतर त्याने सानूवर चाकूने वार केले. यानंतर राम आणि पवन दोघेही त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. शानूच्या बहिणीने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दोन्ही आरोपी ज्या दुचाकीवरून पळून गेले ते पार्लरच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहून पोलिसांनी त्यांना ओळखले. पोलिसांनी त्यातील एक आरोपी पवनला अटक केली आहे, परंतु राम यादव अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानूचा तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता, तीचे हे दुसरे लग्न होते. ती गेल्या चार वर्षांपासून राम यादवसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पोलिसांना त्या दोघांमधील संभाषण आणि संदेशाचे या रेकॉर्ड मिळाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version