बीएसएफने पाकिस्तानच्या शस्त्र असलेल्या ड्रोन ला सीमेवर पाडले

जम्मू काश्मीर, दि. २० जून २०२०: भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान संतप्त झाला आहे. पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अवैद्य हालचाल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा बीएसएफने पाकिस्तानच्या ड्रोनला हाणून पाडले आहे. बीएसएफने कठुआ सीमेवर पाकिस्तानचा हा ड्रोन खाली पडला आहे.

पाकिस्तानकडून आलेल्या या ड्रोनमध्ये काही शस्त्रेही बांधलेली होती. ड्रोनमधून एक एम -४ अमेरिकेने तयार केलेली रायफल, दोन मॅक्झिन आणि ६० राऊंड, सात ग्रेनेड जप्त केले. ही डिलिव्हरी अली भाई नावाच्या युवकासाठी होती आणि ड्रोनसह त्याचेही नाव होते. हे ड्रोन ८ फूट चा होता. असा अंदाज लावला जात आहे की कठुआ सेक्टरमधील बीएसएफच्या पनेसार चौकी समोरील पाकिस्तानच्या बाजूने हा ड्रोन कंट्रोल केला जात होता.

जैश-ए-मोहम्मद च्या चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांकडूनही तीच शस्त्रे जप्त केली गेली. पाक एजन्सींनी केलेल्या या कृतींचा हेतू कश्मीरमध्ये हिंसा आणि शांतता भंग करणे हा आहे. पाकिस्तान कडून भारताच्या बाजूला ड्रोन च्या साह्याने असे शस्त्र पाठवण्याच्या घटना इतर सीमावर्ती भागात विशेषत: कुपवाडा, राजौरी आणि जम्मू प्रदेशातही झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा