आशियातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेचे बजेट

मुंबई, ४ फेब्रुवरी २०२१: सध्या आर्थिक बजेट सादर होत आहे.आशियातील सर्वाधिक श्रीमंत आसलेल्या मुंबई महापालिकेचे बजेट सादर झाले आहे. तो कश्यापद्धतीने सादर झाले त्याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

या बजेट मधे ३९,०३८.८३ कोटी रूपये बजेट सादर, १६.७४ टक्यांनी वाढ झाली आहे.

कोस्टल रोडसाठी बजेटमधे २ हजार कोटी रुपयांची तरतूद

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद.

मिठी नदीचा विकास व प्रदूषण रोखण्यासाठी ३७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

नद्यांच्या पुनरुज्जीवन साठी ५० कोटी.

विकास कामे मार्गी लावण्यासाठी १०० कोटींची तरतूद.

१६७५ कोटी अंदाजे खर्च असलेल्या पुलाचे कामही यंदा मार्गी लावणार आहे.

जलवाहन बोगद्यांसाठी ३९९ कोटी रूपये.

मिठी नदी प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यासाठी ६७ कोटी रूपये.

आरोग्य विभागासाठी ४,७२८ कोटी रूपयांची बजेट.

आरोग्य विभागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ८२२ कोटी रूपयांची तरतूद.

रुग्णालयांच्या बांधकामासाठी १२०६ कोटी रूपयांची तरतूद.

मुंबई महापालिकेच्या नर्सिंग शाळांचे रूपातंर नर्सिंग काॅलेजमध्ये होणार आहे.त्यासाठी २० कोटी रूपयांची तरतूद.

बेस्ट प्राधिकरणासाठी ७५० कोटी रुपयांची मदत

बेस्ट कर्मचार्यांच्या थकीत ग्रॅच्यूएटीसाठी ४०६ कोटी रुपयांचे कर्ज महापालिका बेस्टला देणार.

शैक्षणिक निर्णय…..

२९४५ कोटी रुपयांचे शैक्षणिक बजेट सादर झाले.

मुंबई महापालिकेच्या शाळांना यापुढे मुंबई पब्लिक स्कूल म्हणून संबोधले जाईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी साबण,सेनेटायझरसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद.

कर प्रणाली….

५०० स्क्वे.फूट घरांच्या मालमत्ता करात सरसकट सुट मिळणार नाही,मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर माफ केले.

थकलेले मालमत्ता कर व पाणीपट्टी भरताना मिळणारी सवलतही रद्द.

थकलेले कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पालिकेने सुरू केलेली अर्ली बर्ड योजना रद्द.

यापुढे प्रकल्पबाधितांना थेट रोख रक्कम मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या बजेटमधे यंदा बरेच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी ६ उपनगरीय रूग्णालयांमध्ये पदव्युत्तर डिएनबी अभ्यासक्रम

मुंबईचा विकास व नागरिकांच्या समस्येचे निवारण एकाच ठिकाणी होण्यासाठी एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा अशी सर्व प्राधिकरणे मुंबई महानगरपालिका अंतर्गत यावी असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा