व्यावसायिकाने स्वत:ला कारमध्येच जाळून घेतलं, पत्नी आणि मुलालाही पेटवण्याचा प्रयत्न

नागपुर, २० जुलै २०२२: नागपुरमध्ये एका व्यावसायिकाने स्वत:ला कारमध्येच जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली.

एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते त्यातून बचावले आहेत. परंतू या घटनेत व्यावसायिकाचा मात्र मृत्यु झाला. रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहीती समोर आले आहे.

या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामराज भट यांचा नटबोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर आहे.

रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता. मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते. त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेउन कारमधून निघाले होते.

जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला औषधच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं परंतू पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधच्या रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला.

यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रवपदार्थ तिघावरही फवारला. पत्नी आणि मुलाला काही कळण्या आधिच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा मृत्यु झाला.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा