मुंबई, २ ऑगस्ट २०२२: मंत्रिमंडळ विस्तारावरुन सध्या शिंदे गटावर जोरदार टीका सुरु आहे. अजित पवार यांनी या आधीही दोन वेळा विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे. सर्वांनाच मंत्रीमंडळाची ऑफर दिली. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे. वास्तविक पूर्ण बहुमत असताना त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही का ? असा सवाल अजित पवारांनी केला. सगळ्या आमदारांना खासदारांना जर मंत्रीपद देण्याचं कबूल केलं असेल म्हणून हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही.
हा एक दुजे के लिएचा संसार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. असे आरोपांवर आरोप सध्या सुरु आहेत. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुढील चार दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तसेच हा विस्तार नाही झाला तर मला विचारा असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत आहे. याला देवेंद्र फडणवीस यांचाही दुजोरा आहे. हे देखील दिसून आलं आहे.
पण अजूनही हा विस्तार का झाला नाही? असा सवाल विरोधक विचारत आहे. त्यामुळे शिंदे गटाला टीका सहन करावी लागत आहे. पण या विस्तारावरुन शिंदे गट पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पहायला मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस