तळोजा जेलमध्ये जाऊन सीबीआय करणार वाझेंची चौकशी, देशमुखांना देखील ईडीचे समन्स

मूंबई ३ जुलै २०२१: मुंबई कथित १०० कोटी वसुली प्रकरण आता चिघळले आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांची रवानगी तळोजा जेलमध्ये झाली आहे. याच जेलमध्ये त्यांची पूर्ण चौकशी होणार आहे. न्यायालयाने या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी दिली असून आता चौकशी लवकरच सुरु करण्यात येईल.
वाझेंनी यापूर्वी कोर्टाला पत्र लिहीले होते. ज्या पत्रावरुन चौकशी मोहिम सुरु करण्यात येणार आहे. या पत्रात वाझेंनी तीन बड्या मंत्र्याचा व एका नेत्याच्या नावाचा उल्लेख केला आहे. हे मंत्री कोण आहे, याचा खुलासा जर या चौकशीनुसार झाला तर अनेक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच प्रकरणातले अजून एक आरोपी म्हणजे अनिल देशमुख यांच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे.
अनिल देखमुख यांना ईडीने तिस-यांदा समन्स बजावले होते. पहिल्या वेळेला अनिल देशमुख न्यायालयात गैरहजर राहिले तर दुस-या वेळेलाही ते उपस्थित राहिले नाही. त्यांच्याऐवजी त्यांचा वकिल हजर राहिला. त्यामुळे या वेळेला अनिल देशमुख यांनी स्वत: हजर रहाणे अपरिहार्य आहे. अन्यथा त्यांच्यावर वेगळी कारवाई करण्यात येईल. अनिल देखमुखांचा ईडीचा विळखा त्यांच्यापुरताच मर्यादित न राहता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यालाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता चौकशीनंतर नवीन काय पुढे येते हे पहाणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा