मुंबई, २२ ऑगस्ट २०२०: केंद्रीय अन्वेषण पथक मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर तपास प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण पथकासह त्यांची फोरेन्सिक तपासणी करणारी टीम देखील मुंबईमध्ये दाखल झाली आहे. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सर्व पुरावे व साक्षीदार केंद्रीय अन्वेषण पथकाद्वारे तपासले जात आहे. याबाबत शोधमोहीम कायम ठेवत आज सीबीआय पथकाकडून कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची विचारपूस करण्यात येणार आहे. ज्या डॉक्टरांनी सुशांत सिंहच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं, त्यांची चौकशी केली जाणार आहे.
या तपासाची सुरुवात केंद्रीय अन्वेषण पथकाने कालपासून सुरू केली आहे. आज सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात तर दुसरी टीम वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाली.
दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या खटल्यात सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौकशी करु शकते. रिया सध्या तिच्या मुंबईतील घरी आहे. रियाला अद्याप चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही. याआधी सीबीआयने काल रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी