केंद्रीय पथकानं समन्वयानं केलेल्या प्रयत्नाबद्दल व्यक्त केलं समाधान

नागपूर, १५ सप्टेंबर २०२० : पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्त भागाचा तीन दिवस दौरा केल्यानंतर काल केंद्रीय पथकानं नागपूर इथं विभागीय कार्यालयात आढावा बैठक घेतली. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या नेतृत्वात विभागीय स्तरावरील अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमधल्या ३४ तालुक्यांमध्ये पुरानं झालेल्या नुकसानीचा प्रशासनानं प्राथमिक अंदाज सादर केला, त्यानुसार केंद्रीय पथकाच्या दोन टीमनी या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता.

स्थानिक प्रशासनानं सादर केलेल्या अहवालाबद्दल पथकानं समाधान व्यक्त केले. सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू असून पंचनाम्याची अंतिम आकडेवारी आल्यानंतर पुराच्या नेमक्या नुकसानाची माहिती पुढे येऊ शकेल.तथापि, कालच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असतानादेखील जीवीत हानी होणार नाही यासाठी सर्व विभागाने समन्वयाने केलेल्या सामूहिक प्रयत्नाबद्दल, घेतलेल्या दक्षतेबद्दल या पथकाने समाधान व्यक्त केले.

अचानक आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देत शेतकऱ्यांकडून माहिती पथकाने घेतली आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल आणि प्रत्यक्ष पाहणी यावरुन हे पथक आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा