डोंबिवली, २५ ऑगस्ट २०२० :कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे , नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील कोरोना उपाय योजनांची आढावा बैठक घेण्यात आली , ठाणे पालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही सभा भरली होती . मात्र या वेळेस मुख्यंमत्र्यांना कोरोनाच्या उपाय योजनांचे कमी पण ठाण्यातील रस्त्याचे अपाय जास्त प्रमाणात पाहायला मिळाले . त्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे . हे खड्डे त्वरीत भरावे असे आदेश त्यांनी प्रशासनास दिले आहेत.
ठाण्याला येताना रस्त्यावर खड्डे असल्याचे लक्षात आल्याचे मुख्यमंत्र्यांना जाणवल्याने खड्ड्यांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ” आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील,पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो ” असे ट्विट करत मुख्यंमत्र्यांना टोला लगावला .
कोरोना आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात ठाणे महापालिकेचा आढावा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मुख्यंमत्र्यांसमोर मांडला.
शहरातील खड्यांचा त्रास आपल्यालाही झाल्याने या बद्दल मुख्यंमत्र्यांनी असंतोष व्यक्त केला त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बूजवावे असा इशारा मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी दिला .
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे