पुणे शहर हादरलं ! सेवानिवृत्त पोलीसांच्या मुलाची भर रस्त्यात हत्या

पुणे, ३० सप्टेंबर २०२३: पुण्यातील सिंहगडरोड परिसरातील नवले पुलाशेजारील एका हाँटेल बाहेर, टोळक्याने गज आणि फावड्याच्या दांडक्याने डोक्यात मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. दावत हाँटेल परिसरात काल सायंकाळी आठच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजय ढुमे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा होता. त्यांचा रावेतमध्ये हाँटेल व्यवसाय आहे.

ढुमे हे दावत हाँटेलमध्ये थांबले होते. खाली उतरुन आपल्या थारगाडीकडे जात आसताना, पाठीमागून आलेल्या चौघांनी गज आणि लाकडी दांडक्याने ढुमे यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच सिंहगडरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ढुमे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा