कोंडारभागातील आलेगाव खुर्द ते गारआकोले पुल मार्गाची झाली दुरवस्था

सोलापूर, दि. २५ जुलै २०२०: आलेगाव खुर्द ते गारआकोले पुल या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळायला मार्ग नाही. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण गावांनी एकत्र येऊन ठराव करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेच या रस्त्याचे काम मार्गी लावतो असे आश्वासन दिल्यानंतर गावाने बहिष्काराचा निर्णय मागे घेतला.

नंतर विधानसभेच्या वेळी पण तोच प्रकार घडला त्याही वेळी अशाच प्रकारची आश्वासने देण्यात आली. गेली सात महिने झाले खडी येऊन पडलेली आहे. परंतु अद्यापही रस्त्याला मुहूर्त सापडेना आलेगाव खुर्द ते गारआकोले हा कोंडार भागातील रस्ता असून हा रस्ता पुणे सोलापूर हायवे ते अकलूज असा मधला मार्ग असून या खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

तसेच मागील आठवड्यात या भागात प्रचंड पाऊस झाल्याने गार आकोले पुलापर्यंत जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. असे आलेगाव खुर्दचे डॉक्टर सुदाम कुंभार यांनी न्यूज अनकटला सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा