औंधमधील कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर

औंध, दि. २० मे २०२०: दोन दिवसापूर्वी (१८ मे) औंध मध्ये एक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. यामुळे औंध भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पुणे शहर रेड झोन मध्ये असताना देखील पुण्यातील औंध हा भाग कोरोनामुक्त होता. परंतू सापडलेल्या या पॉझिटिव रूग्णामुळे औंध देखील आता कोरोना बाधित भागांमध्ये समाविष्ट झाले आहे.

सापडलेल्या या रुग्णावर उपचार सुरू आहेत रुग्णाची प्रकृती देखील स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी जयदीप पवार यांनी ‘न्युज अनकट’ शी बोलताना सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. हे अहवाल काल येणे अपेक्षित होते परंतू काही कारणास्तव ते न मिळाल्याने अहवाल आज येण्याची शक्यता आहे.

सदर रुग्ण औंध मधील कल्पनामती सोसायटीमधील आहे. रुग्ण आढळून आल्याचे कळताच प्रशासनाने पूर्ण सोसायटीचे निर्जंतुकीकरण केले तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा