रूपांतरणाचा खेळ सुरूच! मुलांना धर्मांतराचे आमिष दाखविणाऱ्या केरळमधील जोडप्याला अटक

पुणे, १ मार्च २०२३ : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील कानवाणी गावातील दोन स्थानिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी एका ख्रिश्चन जोडप्याला त्यांच्या घरातून अटक केली. पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) ही माहिती दिली. इंदिरापुरमचे सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) स्वतंत्र सिंग यांनी सांगितले की, हे दोघे समाजातील वंचित लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवीत होते. तक्रारकर्ते प्रवीण नागर आणि शिव कुमार यांनी त्यांच्या ‘एफआयआर’मध्ये म्हटले आहे की, ते दोघेही गेल्या अडीच दशकांपासून येथे राहत होते आणि गरिबांना धर्मांतराचे आमिष दाखवीत होते.

सिंग यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अटक केलेले हे जोडपे केरळ येथील रहिवासी आहे. ते गरीब लोकांना जमीन व घर देण्याचे आमिष दाखवून धर्मांतर करायचे. काही काळ ते इंदिरापुरम भागातील कानवाणी येथे आपले मिशन चालवीत होते. यूपी मिशनअंतर्गत ते हिंदूंना ख्रिश्चन बनविण्यासाठी पैसे द्यायचे. या मोहिमेत आणखी अनेक लोक सामील आहेत. पोलिस त्या सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एसीपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपी जॉन संतोष रहिवासी सेक्टर-५ वसुंधरा याने पत्नीसह कानवाणी येथे धार्मिक प्रचार, सभा आणि प्रार्थना करण्यासाठी भाड्याने हॉल घेतला आहे. जिथे मिशनशी संबंधित लोक एकत्र येतात आणि बैठक घेतात. पोलिसांच्या चौकशीत या दोघांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कानवाणी येथील आरोपी जॉन संतोष याच्या दालनातून पोलिसांनी विशेष धर्माची पुस्तके तसेच लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या चौकशीत दोघांनी सांगितले की, ते राज्यातील लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करायचे. त्यांचे संघ राज्य, जिल्हा, शहर आणि ब्लॉक स्तरावर विभागलेले आहेत. या जोडप्याने असेही सांगितले की आजकाल तो लहान मुलांना अभ्यासाच्या बहाण्याने हॉलमध्ये बोलावीत असे आणि त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करीत असे. आपला धर्म जगातील सर्वोत्तम आहे आणि त्यांनी तो पाळावा, असे मुलांना सांगण्यात आले. त्यांना धर्मासंबंधित विविध भ्रामक कथा सांगून, त्यांना विविध प्रकारे आमिष दाखवीत असत. त्याचबरोबर मुलांना खाण्यापिण्याचे प्रलोभन देतानाच पालकांनाही धर्म बदला आणि हिंदू धर्मातील सण साजरे करू नका, असे सांगत.

एसीपी स्वतंत्र सिंह म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक पैलूवर विशेष लक्ष दिले जात आहे. या जोडप्याशी इतर कोणा-कोणाचे संबंध होते, याचाही शोध घेतला जात आहे. यासोबतच यूसीपीआय संस्थेचीही सविस्तर माहिती गोळा केली जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा