आली उचकी करा कोरोना टेस्ट

15

वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट २०२०: कोरोनाने सध्या जगभरात थैमान घातले आहे. तर या व्हायरसवर अनेक संशोधन चालू आहे. यातून गेली बरेच दिवस अनेक वेगवेगळी माहिती आणि खुलासे होत गेले आता त्यातच आणखी एक कोरोना विषाणुच्या लक्षणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या मुळे लोकांना आता अतिसतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

६२ वर्षीय एका व्यक्तीला गेल्या ४ दिवसापासून सतत उचकी येत होती. त्या नंतर त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पाॅजिटिव्ह आली. त्याला इतर कोणतेही लक्षण आणि आजार नव्हते अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्या व्यक्तीची सिटीस्कॅन केले आसता त्याच्या फुफ्फुसावर सुज देखील पाहण्यात आली. असे डाॅक्टरांनी म्हटले आहे. तर उचकी हे देखील आता कोरोनाचे एक लक्षण असू शकतं असं बोललं जात आहे. कारण वरील सर्व दावा हा अमेरिकेतील जर्नल ऑफ मेडिसनच्या रिपोर्ट मधे करण्यात आला आहे.

कोरोनाच्या या वेगवेगळ्या आणि नवीन लक्षणांनमुळे सर्वसामन्यांची तर फार मोठे हाल होताना दिसत आसून या मुळे नागरिक हे आणखीन कोरोनाच्या दहशतीत जगतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी