नाले साफसफाई करण्यासाठी नगरसेवक उतरले गटारीत

मंगरूळ, २५ जून २०२० : मनोहर शेट्टी कादरी हे दक्षिण मंगरूळचे नगरसेवक आहेत.कचरयचे ढीग नाल्यात अडकले आहेत, त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले आहे हे त्यांना समजले. यामुळे पादचा-यांसह वाहतुकीमध्येही समस्या निर्माण झाली होती. नाला साफ करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले होते .

अशा परिस्थितीत मनोहर यांनी कामगारांना बोलावले व नाले सफाई करण्यास सांगितले पण पावसाळ्यात गटारीत शिरण्याचा धोका असल्याचे पाहून त्यानी गटारीत शिरण्यास नकार दिला. यानंतर मनोहर यांनी महापालिकेला हाय-स्पीड वॉटर जेट क्लीनिंग कार पाठविण्यास सांगितले. पण ह ेदेखील चालले नाही.

मनोहर शेट्टी म्हणाले की , मी जेट ऑपरेटरला नाल्यात जाण्याची विनंती केली पण तो या कामासाठी अधिकृत नाही असे म्हणत त्याने नाल्यात उतरण्यास नकार दिला. गोष्टी दिवसेंदिवस वाईट होत चालल्या होत्या. कोणालाही आत जाण्याची इच्छा नव्हती. यानंतर मी स्वत:च गटारात शिरलो. माझ्याबरोबर चार कामगारही आले. गटार सुमारे आठ फूट खोल होती आणि आतून अगदी गडद अंधार होता. टॉर्चचा वापर करून, आम्ही अर्ध्या दिवसात कचरा साफ केला.

ते पुढे म्हणाले की, एखाद्या गरीब माणसाला पाईप्स साफ करण्यास भाग पाडता येत नाही. काही वाईट घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल? या कारणास्तव, त्याने हे काम स्वतः केले. हे काम करतानाचा आपला हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याबद्दल ते म्हणाले- ” मी हे प्रसिद्धीसाठी केले नाही. हे माझे कर्तव्य होते आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी अधिका-यांवर अवलंबून राहू शकत नाही.

मनोहर शेट्टी म्हणाले की, ते निवडलेले प्रतिनिधी आहेत. जर काहीतरी द्रुतपणे केले जाऊ शकते तर आपण ते केलेच पाहिजे. पावसाळ्यात मंगलोरमध्ये मुसळधार पाऊस पडतो. अशा परिस्थितीत या गोष्टी रखडल्या जाऊ नयेत म्हणून नाला साफ करणे गरजेचे होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा