देशाला कोळसा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर

नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२० : देशातील कोळसा उत्खनन, त्यासाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि स्वच्छ, निर्मल कोळसा तंत्रज्ञान या क्षेत्रात रुजवण्यासाठी कोल इंडिया लिमिटेड १ लाख २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

देशाला कोळसा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणं आणि २०२३ – २०२४ पर्यंत १ बिलियन कोळसा उत्पादनाचं उद्दिष्ट साध्य करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाममंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत आयोजित विशेष बैठकीत ही माहिती दिली.

येत्या ३ ते ४ वर्षात यापैकी १४नहजार दोनशे कोटी रुपये दोन टप्प्यात गुंतविण्यात येणार असून त्याचा उपयोग प्रामुख्यानं ४९ खाणींजवळ प्राथमिक टप्प्यातील दळणवळण सुविधांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. कोळसा खाणीतून वर काढल्यापासून तो वाहतुकीच्या मुख्य ठिकाणापर्यंत वाहून नेण्यासाठीच्या या सुविधा असतील.

या वाहतुकीसाठी संगणकप्रणीत नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं असून त्यामुळे सध्याच्या पद्धतीमध्ये होणारं परिवर्तन उपयुक्त ठरणार असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा