नवी दिल्ली, २५ सप्टेंबर २०२०: भारतात पब्लिक ट्रान्सपोर्ट चे स्वरूप बदलत चालले आहे. अशातच रीजनल रैपिड ट्रांजिट सिस्टम (आरआरटीएस) ट्रेनचा पहिला लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या ट्रेनचा पहिला लूक शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. १८० किलोमीटर प्रतितासची वेगवान गती तसेच मेट्रो आणि बुलेट ट्रेन मध्ये असणाऱ्या सुविधा असलेली रॅपिड ट्रेन आता आली आहे.
केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी शुक्रवार २५ सप्टेंबर २०२० ला भारताची पहिली रीजनल रैपिड ट्रांजिट सिस्टम (आरआरटीएस) ट्रेनच्या पहिल्या लुक चे उद्घाटन केले आहे. उद्घाटनाच्या वेळी राष्ट्रीय राजधानी परिवहन निगम (एनसीआरटीसी) चे प्रबंध निदेशक विनय कुमार सिंह आणि एनसीआरटीसीचे बोर्डचे अन्य सदस्यही उपस्थित होते. या व्यतिरिक्त मंत्रालय, एनसीआरटीसी आणि बॉम्बार्डियरचे वरिष्ठ अधिकारी ही उपस्थित होते.
स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आलेली ही ट्रेन एयरोडायनामिक सोबत पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. प्रत्येक कोचमध्ये आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी प्लगइन प्रकाराचे सहा स्वचलीत दरवाजे असणार आहे. तसेच बिजनेस क्लास मध्ये दोन्ही बाजूस ४ दरवाजे असणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे