कंगनाने घर बांधताना नियमांचे उल्लंघन केल्याचे कोर्टाने केले मान्य

मुंबई, २ जानेवारी २०२१: अभिनेत्री कंगना रनौत यांना मुंबईच्या दिंडोशी दिवाणी कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. दोन वर्षापूर्वीच्या जुन्या प्रकरणात एकीकडे बीएमसीला कोर्टाने दिलासा दिला आहे, तर अभिनेत्री कंगना रनौत यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण बाब कंगनाच्या मुंबई घराची आहे, जी गेल्या दोन वर्षांपासून बर्‍याच वादावरुन चर्चेत आहे. बीएमसीच्या वतीने असा आरोप केला जात आहे की, कंगना रनौत यांच्या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केले गेले होते, तर कंगनाने न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्या कारवाईवर स्थगिती मागितली.

कंगना रनौत यांना कोर्टाकडून मोठा धक्का

आता याच प्रकरणात दिवाणी कोर्टाने कंगना रनौत यांची याचिका फेटाळून लावली आहे. आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, कंगनाने घर बांधताना नियमांचे गंभीर उल्लंघन केले आहे. कोर्टाने म्हटले आहे – ‘कंगनाने तीन फ्लॅट्सचे एका युनिटमध्ये रूपांतर केले आहे. त्यांनी आपल्या सोयीनुसार बदल करत संक एरिया, डक्ट एरिया आणि सामान्य रस्ता देखील आपल्या फ्लॅट मध्ये घेतला आहे. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन मानले जाईल.’ त्याचबरोबर हे देखील सांगण्यात आले आहे की, ‘बीएमसीची नोटीस कायदेशीररित्या चुकीची आहे हे कंगना रनौत सिद्ध करू शकली नाही. अशा परिस्थितीत त्यांची याचिका फेटाळण्यात आली आणि त्यांना कोणताही दिलासा दिला जाणार नाही.’

कंगना मुंबई उच्च न्यायालयात जाणार

त्याच वेळी, जेव्हा बीएमसीकडून नोटीस आली तेव्हा आलेल्या नोटिसमध्ये स्पष्टपणे काहीही सांगितले गेले नाही यावर कंगना रनौत यांच्या वकिलांचा आक्षेप होता, तेव्हा बीएमसीच्या वकिलाने नोटिसमध्ये आठ गंभीर उल्लंघनांचा उल्लेख केल्याचे सांगितले. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, बाहेरील भाग बाल्कनी म्हणून वापरला जात होता, तर अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामही पाहिले गेले. कोर्टाच्या या मोठ्या धक्क्यानंतर कंगना रनौत मुंबई उच्च न्यायालयात जात आहे. मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळेल अशी तिची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा