देशाचा कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.८१ शतांश टक्के

Madhya Pradesh, Aug 02 (ANI): COVID-19 Patients who are now fully recovered and being discharged from the Government Khushilal Sharma Ayurvedic hospital and institute, in Bhopal on Sunday. (ANI Photo)
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२० : देशाचा कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.८१ शतांश टक्के असल्याचं सरकारनं म्हटल आहे. गेल्या २४ तासात ८२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकंदर ५९ लाख ८८ हजार रुग्ण या आजारातून बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयांनं दिली आहे.
रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं वाढ होत  असल्यानं बाधित रुग्ण दर सध्या
१२.६५ शतांश टक्के झाला आहे. देशात बाधित रुग्णांची संख्या ८ लाख ८३ हजार इतकी आहे. गेल्या २४ तासात ७३ हजार २७२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून,देशातली आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकंदर संख्या ६७ लाख ७९ हजार झाली आहे.
चाचणी ,मागोवा आणि उपचार या केंद्र सरकारच्या त्रीसूत्री धोरणाच्या सुयोग्य कार्यवाहीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन मृत्यू दरात घट  झाली आहे. देशातला कोविड १९ चा मृत्युदर सध्या १.५४ शतांश टक्के आहे,जो जगातल्या सर्वात कमी मृत्युदंरापैकी एक आहे. गेल्या २४ तासात कोविड१९ मुळे ९२६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या १ लाख ७ हजार ४१६ झाली आहे.
गेल्या २४ तासात देशभरात ११ लाख ६४ हजारांहून जास्त कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली.आत्तापर्यंत देशभरात ८ कोटी ५७ लाखांपेक्षा जास्त नमुने तपासण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा