मुंबई, ८ जानेवारी २०२१: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम पी एस सी) परीक्षांविषयी आज (८ जानेवारी) निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरापासून या परीक्षा रखडल्या आहेत. मार्चमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. असे सांगितले जात आहे की या परीक्षांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे व त्याबाबत तारखांची घोषणा आज करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.
कोरोना चे संकट येऊन आता वर्ष झाले आहे. तथापि मार्च महिन्यापासून भारतात लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत या परीक्षा रखडले आहेत. राज्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षांची तयारी उमेदवार गेल्या वर्षभरापासून करत आहे. लॉक डाऊन नंतर सरकारने अनलॉक प्रक्रिया देखील सुरू केली. शाळांबाबत देखील अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र, एमपीएससीच्या परीक्षा केव्हा घेण्यात येतील याबाबत उमेदवारांकडून वारंवार प्रश्न विचारले जात होते. अखेर आज त्यावर निर्णय होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर दुय्याम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. या सर्व परीक्षांची अधिकृत घोषणा राज्य सरकारतर्फे आज ( शुक्रवार ८ जानेवारी) होण्याची शक्यता आहे.
कोरोना नंतर या परीक्षा पुढे ढकलण्याची दुसरे मुख्य कारण म्हणजे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती. आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. एमपीएससी च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे