धुळदेव येथे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी साजरी

फलटण, ११ फेब्रुवारी २०२३ : धुळदेव (ता. फलटण) येथे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३७ वी पुण्यतिथी सुवर्णकार समाजबांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली.

पहाटे धुळदेव येथील संत सावता माळी मंदिरामध्ये असलेल्या श्री. नरहरी महाराजांच्या मूर्तीला आभिषेक करण्यात आला. पुण्यतिथीनिमित्ताने मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गावामधील महिला व पुरुष यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. महिला व पुरुषांनी फुगडी, भजन, अंभग गात पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाच्या गजरात साजरा केला. संत नरहरी महाराजांच्या नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

सुश्राव्य कीर्तनानंतर नरहरी महाराजांच्या मूर्तीची आरती करण्यात आली. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. नगरसेवक अजय माळवे, अशोक शेठ शहाणे, धुळदेवचे सरपंच व्यंकटराव दडस, मार्केट कमिटीचे संचालक परशुराम फरांदे, पाणीपुरवठा सोसायटीचे चेअरमन माणिकराव कर्णे, धुळदेव येथील सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ विलास नांदले, ॲड. हरीश महामुनी, प्रा. संजय दीक्षित, राहुल महामुनी, विकास नांदले, शिंदे सर; तसेच ग्रामस्थ, भाविक भक्तमंडळी, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा