पंजाबमधील विषारी दारुच्या बळींमध्ये वाढ मृत्यूचा अकडा पोहचला ८० वर

पंजाब, २ ऑगस्ट २०२० : काही दिवसांपुर्वी पंजाबमध्ये विषारी दारु पिऊन २१ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पण हा अकडा आता वाढला असून पंजाब शहर हे पार हदरुन गेलं आहे. तर दारु मुळे होणा-या या मृत्यूच्या तांडवाने अनेक संसार हे उघड्यावर आले आहे.

पंजाब मधील तीन जिल्हात विषारी दारुने अक्षरक्ष: हाहा:कार माजवला आहे. तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आता समोर आली आहे. २१ जणांचा मृत्यू या दारु मुळे झाला असताना आता हा अकडा वाढून ८० वर गेला आहे. त्या मुळे पंजाबमध्ये या विषारी दारु मुळे शोकाकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंजाब पोलिस हे या घटनेवर सर्वस्व पणाला लावून तपास करत आहेत. तर त्यांनी या विषारी दारु प्रकरणात २५ जणांना ताब्यात घेतले आहे. पंजाब मधील बाटला, अमृतसर आणि तरनतारन या जिल्हामध्ये हि घटना घडली असून मृतांची शक्यता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा