जागा वाटपाचा निर्णय समिती गठीत करून घेतला जाणार, अजित पवार यांची माध्यमांशी संवाद साधताना माहिती

मुंबई, १५ मे २०२३ : महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल मुंबईमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रित लढवण्याचे बैठकीत ठरले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. जागा वाटपासाठी समिती गठीत करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तिन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन सदस्य चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

देशात पासून झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांचे चित्र वेगळे होते.त्यामुळे विरोधकांच्यात नाराजीचा सूर होता. परंतु नुकत्याच आलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालामध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. विजय एवढा मोठा मिळाला, की एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षाही जास्त जागा मिळाल्या. यामुळे सर्वच विरोधकांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यामुळे पुढची महाविकास आघाडीची दिशा काय असावी? वज्रमुठ सभा कुठे कुठे आणि केव्हा घ्याव्यात? यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

जागा वाटपाचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन सदस्य बसून निर्णय घेणार आहेत. यामध्ये लोकसभेच्या ४८ जागा आणि विधानसभेच्या २८८ जागांवर चर्चा होणार आहे. यामध्ये प्रत्येक पक्षाची चर्चा करून, त्याचबरोबर इतरही छोटे-छोटे पक्ष जे बरोबर येणार आहेत त्यांना मानणाऱ्या मतांचा विचार करून त्यांनाही आपल्याबरोबर कसे सामावून घेता येईल, यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा