सुरेश रैना आणि हरभजन सिंग या खेळाडूंबाबत सीएसके संघाने घेतला हा निर्णय

नवी दिल्ली २ ऑक्टोबर,२०२०: आयपीएल २०२० सुरू होण्याआधीच सीएसके संघाचे दोन दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२० मधून माघार घेतली होती. यानंतर सीएसके तर्फे या दोन्ही खेळाडूंचे नाव त्यांच्या वेबसाईटवरून काढण्यात आले होते. यानंतर आता नुकतेच सीएसके संघाने या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेत यांचा कॉन्ट्रॅक्ट संपवण्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०१८ मध्ये झालेल्या नीलामी मध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी तीन वर्षांसाठी सीएसके संघांसोबत करार केला होता तो २०२० मध्ये संपणार होता परंतु ते या सीजनमध्ये खेळलेच नाही. यामुळेच सीएसके फ्रांचाईसी दोन्ही खेळाडूंसोबतचा करार संपवण्याची घोषणा केली आहे. क्रिकेटर सुरेश रैना यांच्यासोबत प्रति वर्ष अकरा करोड तसेच हरभजनसिंग याच्यासोबत प्रतिवर्ष दोन करोड रुपये इतका करार करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार या खेळाडूंना या वर्षाचे मानधन दिले जाणार नाही. एका वेबसाईटने सी एस के संघाचे सीईओ काशीविश्वनाथ यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी या बाबतीत काहीही सांगण्यास नकार दिला. जेव्हा त्यांना विचारण्यात आले या खेळाडूंना पैसे देण्यात येणार आहे का परंतु त्यांनी सरळ सांगून दिले की त्यांना तेव्हाच पैसे दिले जातील जेव्हा खेळतील परंतु त्यांनी खेळण्यास नकार दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा