विजयदुर्ग किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली

देवगड, ४ ऑगस्ट २०२०: देवगड तालुक्यांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. देवगड तालुक्याचे विशेष स्थान म्हणजे विजयदुर्ग किल्ला. महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेले हे किल्ले राज्यासाठी अमूल्य ठेवणे आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या किल्ल्याची पडझड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पावसामुळे या किल्ल्याची महत्त्वाची संरक्षण भिंत कोसळली आहे. गावाच्या दिशेने असलेल्या या बुरुजाची तळाशी बाजू ढासळल्याने वरचा बुरुज आता धोकादायक झाला असल्याने तो केव्हाही कोसळू शकतो.

या बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत बांधण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे आता ही भिंतच कोसळल्यामुळे या बुरुजाला देखील धोका निर्माण झाला आहे. परिणामी किल्ल्याच्या संरक्षणासाठी व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या किल्ल्याच्या जडणघडणीत देखील आता धोका निर्माण झाला आहे.

हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आहे.

न्यूज अनकट प्रतिनधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा