तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांसह शिष्टमंडळाची बारामतीला भेट, शेतीचे अधुनिक तंत्र पाहून झाले प्रभावित

बारामती, ६ नोव्हेंबर २०२० : तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी आज राज्याचे कृषी सचिव बी. जनार्दन रेड्डी, कृषी संचालक एल. वेंकटराम रेड्डी, सहसंचालक व्ही सरोजिनी देवी, उपसंचालक एम.व्ही. मधुसूदन, अपेडाचे उपमहासंचालक नागपाल लोहकरे, संशोधन संचालक डॉ. ए. भगवान, उपसंचालक के. वेणुगोपाल यांच्यासमवेत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. तेथील कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे काम पाहून हे शिष्टमंडळ प्रभावित झाले.

ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र पवार यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती व येथील कृषीतंत्रज्ञान प्रसाराच्या कामाची माहिती कृषिमहाविद्यालाय येथे दिली. नंतर रेड्डी यांनी कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. पुणे जिल्ह्यातील भौगोलिक माहिती, केंद्राच्या फार्मची माहिती श्री संतोष करंजे व डॉ रतन जाधव यांनी दिली.

येथील मृदा व पाण्याची स्थिती त्यांनी जाणून घेतली. येथील जिवाणू प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेची माहिती घेतली. तसेच भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रासही त्यांनी भेट दिली. मधमाशीपालन व शेती उत्पादन वाढण्यासाठी त्याच्या उपयोगाची त्यांनी माहिती घेतली. पशूं अनुवंश सुधार गुणवत्ता केंद्रास भेट देऊन येथे होणाऱ्या देशी गायी मैशी च्या संशोधनाची माहिती डॉ डी पी भोईटे व डॉ रासकर यांनी दिली.

तदनंतर सांगवी येथील नाथसंन फार्मर्स कंपनीची ४५० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेले उपक्रमाची माहिती चेअरमन श्री नितिन तावरे यांनी दिली, तदनंतर फलोत्पादन संघ बारामती मध्ये सुरू असलेले उपक्रमाची माहिती चेअरमन श्री घनवतसाहेब, व श्री प्रमोद निंबाळकर यांनी दिली, वासूनदे ता दौंड येथील केळी व डाळिंब निर्यात INI फार्म पहिला व बारामती सारखी सुधारणा तेलंगणा राज्यात करण्यासाठी आम्हाला उपयोग होईल असा संकल्प केला.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा