मृत्युच्या दारातून डॉक्टरांनी वाचवला चिमुकल्याचा जीव, होता १०० तास कोमात

रायपुर, १३ ऑगस्ट २०२२: छत्तीसगडच्या बस्तर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी एका सात वर्षीय चिमुकल्याला जीवदान दिलंय. नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील छिंदगड येथील रहिवासी सात वर्षीय निलांबरला अत्यंत गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं.

त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनिया पसरला होता. मुलावर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे एचओडी साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी निलांबर या मुलाला वैधकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं.

तो कोमात होता. मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले. तो कोमात असताना त्याला शॉक थेरीपीही देण्यात आली. अखेर ६ दिवस व्हेंटिलेटरवर उपचार केल्यानंतर त्याचे प्राण वाचले आहेत. १०० तास बेशुद्ध आणि १४० तास व्हेंटिलेटरवर उपचार केल्यानंतर मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा