गोल पोस्ट गुन्हा कुत्र्यांनी बकरीला चावा घेतला, बकरीच्या मालकने संपूर्ण गावातील कुत्र्यांचा घेतला सूड

कुत्र्यांनी बकरीला चावा घेतला, बकरीच्या मालकने संपूर्ण गावातील कुत्र्यांचा घेतला सूड

कटक, २६ जून २०२० : कटक ओडिशा मध्ये एका बकरीला कुत्र्याने चावा घेतला. यामुळे बकरीच्या मालकाला राग आला. आणि त्याने त्याच्या गावातील ४० कुत्र्यांना विष देऊन मारून टाकले .

प्रकरण कटकमधील चौद्वार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आहे. एका वृत्तसंस्थेनेेे दिलेल्या वृत्तानुसार ब्राह्मानंद मलिक यांच्या शेळीला काही दिवसांपूर्वी कुत्र्यांनी चावा घेतला होता. ब्रह्मानंदांना या गोष्टीचा फार राग आला. त्याने आपला सहकारी भरत मलिक यांच्यासह संपूर्ण गावातील कुत्र्यांना ठार मारण्याची योजना आखली.
दोघांनीही मांस विकत घेतले आणि मांसात विष जोडले. आणि हे मांस गावभर कुत्र्यांना दिले. कुत्र्यांनी मांस खाल्ले व ते मरू लागले.

एका गावक-यानी सांगितले की, अशा वेदनांनी कुत्रे मरत आहेत हे पाहून खूप वेदना होत आहे . ते म्हणाले की या व्यक्तिच्या कृत्याने संपूर्ण मानवतेला लाजिरवाणे केले आहे.

याप्रकरणी गावप्रमुखांनी पोलिसांत तक्रार दिली असून त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु ब्राह्मानंद मलिक आणि भरत मलिक हे ४० कुत्री मारून फरार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version