चालकाला स्वत: च्या वाहनाने चिरडले

छत्तीसगड, ३ मार्च २०२१ : छत्तीसगडमधील गोरेल्ला-पेंद्रा-मारवाही (जीपीएम) जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी ट्रॅक्टर पलटीने चालकाचा मृत्यू झाला. चालक कच्ची वीट घेऊन येत  होता. त्याच वेळी शेतातुन रस्त्याकडे ट्रॅक्टर चढविताना इंजिन पलटी होउन ट्रॉली वर आदळले इंजिन आणि ट्रॉली मध्ये चालक चेंबला गेला .स्थानिकांनी पोलिसांला कळविले माहिती मिळाल्यानंतर पोलिस तब्बल दोन तास उशिरा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठविले.  गौरेला पोलिस स्टेशन परिसरातील धनपूर ढोबरजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास राजडीह येथील रहिवासी असलेला लाला इतवारी येथून कच्च्या वीटसह ट्रॅक्टरवर सल्हेकोटाकडे जात होता. अचानक इतवारी लोकलजीक शेतातुन रस्त्यावर ट्रॅक्टर चढविताना समोरचा भाग वर धक्का बसला व इंजिन उभे झाले . धक्का इतका वेगवान होता की लाला ट्रॅक्टर आणि ट्रॉली दरम्यान चेंबला गेला. कोणी काहीही करण्यापूर्वी लालाचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, लाला सुमारे पाच वर्षांपासून ट्रॅक्टर चालवत होता. अपघात पाहून प्रवाश्यांनी १०८ व ११२ ला फोन करून कळवले. लोक म्हणतात की यानंतरही सुमारे २ तास उशिरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. लोक म्हणाले की असा अपघात या आधी कधीही पाहिले नाही. आज त्यांचे पार्थिव शवविच्छेदन केले जाईल.
न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा